कीडा
कीडा
संशयाचा कीडा
वाकुडा तिकुडा
लागता एकदा झाड
कुरतडून सोडी!
घालवी मन:शांती
वाढवीतो भ्रांती
समजेना कसे
करु निरसन!
संशयाचे भूत
नाही सरळसूत
बसले एकदा की
उतरत नाही!
मंत्र तंत्र काही
चालेना उपाय
काही केल्या
सोडेना हो झाड!
