हे चंद्रमा
हे चंद्रमा
1 min
121
हे चंद्रमा तुज पाहता
भरुनी येई सागरा
हे चंद्रमा तुज पाहता
मन ये भरुनी प्रियवरा
दर्शन तुझे होता घडे
जणू भेट मम प्रियाची !
स्पर्शती किरणे तुझी
प्यारी मिठी तयाची !
आहे सखा तुजसारखा
म्हणुनी हरखे वसुंधरा !
ये मोहरुनी चांदणी
ही रातराणी ये भरा !
हे चंद्रमा ये चंद्रमा
कलेकलेने शशीवरा !