चल टाकू या पाऊल पुढे!
चल टाकू या पाऊल पुढे!
तू मला आवडते
मी तुला आवडतो
मग जात पात
देव धर्म
येतो कुठे?
चल टाकूया
पाऊल पुढे
दुनियेला काय त्याचे?
काही दिवस बोलतील
मग शांत होतील
ते पोसतात कां आम्हा?
नको धरु संकोच
नको धरु संशय
मी आहे पूर्ण
तुझ्या पाठीशी!