छंदीफंदी!
छंदीफंदी!
1 min
4
उगीच
छंद म्हणून
मी पसारा
वाढवित राहिलो
मी न कुणी महान
गायक
लेखक
कवी
पण गोड
गैरसमजुतीत राहिलो !
माफ करा
माझ्या धृष्टतेला
तुम्हापुढे सदा
मिरवीत राहिलो !
मी न कुणी महान
गायक
लेखक
कवी
पण गोड
गैरसमजुतीत राहिलो !
विसरा या अपराधा
सोडूनी द्या
मला एकटे!
उगीच तुम्हा
सतावत राहिलो!
सुरेश कुळकर्णी
