वारी
वारी
वारीची वाट होती
पाऊले पडत होती
विठ्ठल विठ्ठल म्हणता
माऊलची साथ होती
धरा रिंगण रिंगण
करु नाम स्मरण
गाऊ भजन कीर्तन
प्रवचन जागरण
पंढरीची आस होती
दर्शनाची ओढ होती
विठ्ठल विठ्ठल म्हणता
वाट ही सरत होती
आली आली हो पंढरी
पोहचलो महाद्वारी
पुंडलीक नदीतीरी
उभा हरी विटेवरी
म्हणा विठ्ठल विठ्ठल
जय विठ्ठल विठ्ठल
ज्ञानेश्वर माऊली
जय पांडुरंग विठ्ठल !