STORYMIRROR

Manisha Patwardhan

Inspirational Others

3  

Manisha Patwardhan

Inspirational Others

लाल बहादुर शास्त्री

लाल बहादुर शास्त्री

1 min
339

रत्ने अनेक

परि या सम हा

वर्तणूक पहा

सात्विक एक ...

नशिबी नाही

कौतुक ते आले

दुज्यांचेच झाले

काम न काही ...

कर्तृत्व थोर

राहणी ही साधी

वंदावेच आधी

लीन समोर ....

मूर्ती लहान

काम असे मोठे

वागले न खोटे

किर्ती महान ...

यांच्या चरणी

करीते वंदन

पुज्य ते स्मरण

थोर करणी ...

जय जवान

लोकां मंत्र दिला

सन्मान पाहिला

जय किसान ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational