STORYMIRROR

pranav kode

Inspirational

3  

pranav kode

Inspirational

पण-तिला झाकू शकत नाही

पण-तिला झाकू शकत नाही

1 min
28.9K


तो पेन तर असतोच सगळ्यांकडे

 तरी ती पेन्सिल कमी ठरत नाही

वंशाचा असला तरी दिवा

पण-तिला झाकू शकत नाही

एकुलता एक मुलगा हवा

कशाला सोबत मुलगी हवी

पण त्याला सांभाळणारी तिच्यातली प्रेमळ

बहीणच त्यांना कळत नाही

लग्नासाठी तर सुंदर हवी

मग लग्नानंतरच का नको

शेवटी जन्म देणारी आईसुद्धा

त्याला बायकोपुढे दिसत नाही

म्हणून वंशाचा असला तरी दिवा

पण-तिला झाकू शकत नाही

 तेजस्वी मुळातच असते ती

तेव्हा दिवाही तिला लागत नाही

मग चंद्रावरही पाणी शोधते ती

फक्त डोळ्यातलाच पाणी पुसत नाही

स्त्री दोन अक्षरच नाहीत

तर दोन पिढ्यांची नाळ ती आई

चूल नि मूल सांभाळून सुद्धा

ती माहेर कधीच विसरत नाही

हसताना आनंदात मुलगा पहिला

पण डोळे पुसायला तर मुलगीच हवी

तरी कन्यादानाचं ओझं म्हणून

तिला कधीच न्याय मिळत नाही

 धोनी तर सगळ्यांना लगेच आठवतो

पण वर्ल्डकप खेळणारी मिताली नाहीच

अश्यानेच कित्येक पि.टी उषा

 साधं स्वप्नातही धाऊ शकत नाहीत

 अहो एकच स्त्री ती एकच ताई

कधी बायको तर कधी आई

 पण पर्वाही नसते साधी कुणाला

तिच्या मातृत्वालाही किंमत नाही

जिद्द तिची तर झाशीची राणी

 परिस्थितीलाही ती भीत नाही

फक्त एका ठिणगीची गरज

मग वणव्यालाही ती कमी नाही

 अग्नीला मुलगा हवाच असला

तरी जन्मतः मात्र स्त्रीच हवी

 मधल्या अंतरात शिस्तीसोबत

प्रेमासाठी मुलीला पर्याय नाही

 शेवटी तीच वंश वाढवणार आहे

 पणती वा दिवा पेटवणार आहे

निदान एकविसाव्या शतकात तरी

फक्त मुलाचाच विचार बरा नाही.

म्हणून वंशाचा असला तरी दिवा

पण-तिला झाकू शकत नाही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational