मनात...
मनात...
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
431
काय घडतंय
काहीच कळत नव्हतं फारसं
पण होतं ते काहीतरी अद्भुत
चमत्कारिक अवर्णनीयच
प्रत्येक क्षणाला एक नवीन स्वर
तिच्या गळ्यातून मोत्यासारखा येत होता
सारंकाही पूर्वीसारखं नव्हतं आता
माझ्याच नकळत
माझ्या मनात
तिच्या नावावर
एक वेगळाच इतिहास लिहिला जात होता
सुवर्णाक्षरात