गळता गळता...
गळता गळता...
कळी असता गोंडस
उत्सुकता उद्याची असते
मोठी होते खुलते फुलते
सारे सुगंधी असते
पोट भरून तरुणपणातच
म्हातारे प्रत्येक जण होते
बावले फुल म्हणुन कधी
का झाडाला ओझे होते?
वृद्धाश्रमात वाढते गर्दी
एकांत मुलांना हवा असतो
बाप आपला देव तो
शाळेतच राहिलेला असतो
गळता गळता फुलही
ते काहीतर देतचं असतं
आपल्याच मुळाशी पडून ते
आपलच पोट भरत असतं