गजरा...
गजरा...
1 min
395
रंग लावले चेहर्यावरती
म्हणजे रूप कुणाचे खुलते का?
आहे तसेच गोड मानून
स्विकार करणे बरे नव्हे का
गजरा सुंदर केसमधला
सुगंध नुसता देत नाही
सौंदर्य खुलवतो मागून
ओझे कधीच भासत नाही
टिकली छोटी लावली म्हणुन
फॅशन कधी बिघडते का
रंग लावले चेहर्यावरती
म्हणजे रूप कुणाचे खुलते का
सुंदरता मनाची असते
देखावा तो देहावरती
फॅशन केली नुसती म्हणजे
सुंदर कुणी कधी बनते का