स्वप्नात...
स्वप्नात...
बघितलं जरी तिला
तरी सहज ओठांवर हसू येतं
तिच्या नुसत्या जाणिवेनं हि
सारं काही हलकं वाटू लागतं
नसतानाही असते ती
गोड आठवणींसारखीच
असल्याचे होतात भास
मिठीत असल्यासारखीच
सुंदर एकांत असतो मग
तिचा आणि माझा
त्या बंद डोळ्यांच्या आत
कुणीही नसताना
पण सारं काही शांत होऊन जातं
काही क्षणात
ती स्वप्नातली राजकुमाराची परी
येतचं नाही बाहेर
वास्तवाच्या जगात