STORYMIRROR

pranav kode

Others

3  

pranav kode

Others

कळी...

कळी...

1 min
377

माझ्या समोर त्या झाडाने

त्यादिवशी कन्यादान केलं

विचारही स्वतःचा न करताच

होतं ते सारं देऊन टाकलं

दोघे श्रीमंत आले होते

त्याच्याकडे भीक मागण्यासाठी

जगवत होते त्याला फक्त

स्वताःच्या देवाला खुश करण्यासाठी

खाण्यासाठी पानं माझी

बसण्यासाठी देह घेतला

उमलण्या आधीच निरागस पोरीला माझ्या

भीती पोटी घेऊन गेला

भीती त्याची कसली फक्त

नेईल पळवून तिला शेजारी

सकाळी लवकर उठवत नाही

तर रात्री तोडायची असते का कळी

सारे दिसत होते त्याला

काहीच तरी नाही बोलला

माणसांच्या खोट्या अश्रूंना बघून

कन्यादान कळीचं करून बसला 


Rate this content
Log in