माझ्या स्वप्नात...
माझ्या स्वप्नात...
उरलाय थोडा फार निसर्ग
ह्या कॉंक्रिटच्या जंगलात
निंबोनिच्या झाडामागे लपत नाही
ह्या निसर्गातला चंद्र
त्यालाही लागतातच उंच उंच मजले
पक्षी किलबिल करतच नाहीत
ह्या निसर्गात
कोंबडाही आरवत नाही
पहाटे
सकाळ होते ती फक्त
यंत्रांच्या आवाजांनीच
त्यांच्याच कुशीत रात्र घालवल्यानंतर
फक्त दोनच ऋतू उरलेत ह्या निसर्गात
पावसाळा आणि उन्हाळा
पन्नास पन्नास टक्के सत्ता स्थापन केल्यासारखे
हरवत चाललाय माझा निसर्ग
माझ्याच स्वप्नात