STORYMIRROR

pranav kode

Others

3  

pranav kode

Others

पर्याय नाही...

पर्याय नाही...

1 min
390


जगी सारे सोपे

वाटते दुरून |

वाट नाही दिसत

गुरूविना ||

दिसत नाही ईश्वर

सारे जग शोधूनही |

डोळे मिटून गुरू दावी

परमेश्वर ||

शिकवत नाही गुरू

घडवतो शिष्य सारा |

पर्याय नाही दुसरा

गुरूविना ||

कलियुगी आता

बदलले स्वरुप |

अर्थ तरी ओळखावा

गुरूचरणी ||


Rate this content
Log in