शब्द...
शब्द...
तिला पाहताना
सुचलेल्या काही ओळी
शब्दांनी नकळत माझ्या
मनात वाचल्या काही
चंद्र होता साक्षीला
मी काहीच केले नव्हते
शब्दांनीच ठरवून सारे
कवितेत बांधले होते
मी नाही म्हटले तरीही
कुणीच ऐकले नाही
शब्दांनीच रचल्या ओळी
शब्दांनीच कविता केली