कस आता कंबर
कस आता कंबर
सत्याच्या जगात
कलयूग आलं
बापाच्या खांदयाला
मुलीचं ओझं झालं ----- ||
कोण तुझी माता
कोण तझा पिता
कोठेही उरला नाही
जगी रक्षण कर्ता ----- ||
गर्भात तुझी हत्या
हीच का ती आई
राखी कोण बांधनार
मी शोधू कोठे ताई ------ ||
हुंडया पायी सारा
होत असे घात
दोषी वर सारे
हारामी एक जात ------ ||
कस आता कंबर
होय झाशीची राणी
तुझ्या रक्षणाची
तुच घे हमी --------- ||