उद्याच्या देशाची शान
उद्याच्या देशाची शान
तू आहेस खूप छान
तुला म्हणतात रूपाची खान
तू उद्याच्या देशाची शान
याची आहे आम्हाला जाण
नको करू तू गर्व ,समाज पाहतोय तुला सर्व
कुठे च्या रूपात पोरगी, तर कुठे देशाची क्रांती विजयी मुलगी
कोणी तुला कितीही बोलू दे समाज तुला कितीही छळू दे
नाही हरणार, तू तर लढणार
तुला म्हणतात सावित्रीची वीर मुनगी
का करतात स्त्री गर्भपात, पोटी मुलगी कळता का येतो संताप
न काही विचार करता करतात गर्भपात
या जगात त्यांच्याहून नसणार हलकट जात
अरे तुला ,बायको हवी लग्नासाठी , तुला आई हवी मायेच्या शब्दासाठी
अरे मग तुला का नको बहीण, तुला का नको बहीण हातावर राखी बांधण्यासाठी
तुला का नको मुलगी ?
जी नाव आणि सन्मान करते देशासाठी
मुलगीच डॉक्टर मुलगीच इंजिनियर, का करतोस तू बरबाद या देशाचं करियर
अरे मुलींमुळेच आहे या देशाची प्रगती
पण तू तर पडला मंदमती
तू तर पडला मंदमती.
