मी नाही पाहत...
मी नाही पाहत...
खुप मज्जा असते काॅलेजची
सर्व मुलांसोबत असताना
त्या मुलीला पाहताना
अचानक आले सर म्हणाले,
का पाहतोस रे
माझ्या मुलीच्या केसांना
मी म्हटलं,
सर मी नाही पाहत
तुमच्या मुलीच्या केसांना
ते आपोआप दिसतात
माझ्या डोळ्यांना...
मी पाहतो नाजुक ओठांना
त्या नशेली डोळ्यांना
पण मी खरं सांगतो
मी नाही पाहत
तुमच्या मुलीच्या केसांना
ते आपोआप दिसतात
माझ्या डोळ्यांना
तिच्या सुंदर हातांनी
खाऊ घातले आईस्क्रीम मला
म्हणुन पाहतो तिच्या बोटांना
पण मी नाही पाहत
तुमच्या मुलीच्या केसांना
ते आपोआप दिसतात
माझ्या डोळ्यांना...
चालताना ती मागे पाहते वळून
तिच्या गालावरची खिलते
कळी खळखळून
म्हणून पाहतो तिच्या गालांना
पण मी नाही पाहत
तुमच्या मुलीच्या केसांना
ते आपोआप दिसतात
माझ्या डोळ्यांना...
तिच्या शिवाय मी नाही
पाहत दुसरे कोणाला
दुसरे कोणामध्ये
नाही दिसत ती मला
म्हणून पाहतो मी तिला
पण खरंच मी नाही पाहत
तुमच्या मुलीच्या केसांना
ते आपोआप दिसतात
माझ्या डोळ्यांना .....
