STORYMIRROR

Trupti Naware

Inspirational

3  

Trupti Naware

Inspirational

अविचार

अविचार

1 min
27.7K


  

एक विचार सापडला मला

कच-याच्या ढिगा-यात

एकटा होता..

तळमळत होता..

काही दुःख दडलय त्याच्या आत..

स्पर्शही करत नव्हते कुणी 

जवळही घेत नव्हते कुणी 

तो माञ वाट पहात होता

कुणी घेतय का त्याला हातात ..

शरीरावर जखमा होत्या

चेहऱ्यावर खुणा होत्या 

रक्ताळलेल्या नियमांच्या

तो दडपणाखाली वाटत होता

जणु काही डांबतय कुणी तुरुंगात ..

त्याला सांगायचं होतं 

बोलून मोकळ व्हायचं होतं 

पण ओठ शिवले गेले 

समाजबंधनाच्या धाग्यात..

मी जवळ गेले त्याच्या 

कुरवाळले त्याला

पण चटका बसला त्याचा

मलाही जोरात ..

पाठमोरी वळले

परत त्याला न्याहाळले

कां बरं इतक्या दुःखातही

दिसतोय हा रागात ...

तिथेच राहीला तो..

तिथेच संपला तो..

कृत्रिम श्वासाच्या मरणप्राय वेदनेत

कचरा झाला तो..

कारण..कारण अविचार होता तो

सुंदर विचारांच्या ढिगा-यात र्यात...!!!

            


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational