STORYMIRROR

Vijay Sanap

Inspirational Others

3  

Vijay Sanap

Inspirational Others

नविन वर्ष

नविन वर्ष

1 min
27.7K


नविन वर्षाची

उभारावी गुढी

मनोमनी ठेवा

साखरेची गोडी ।।

ताब्याचा कळस

कोरीचक्क साडी

आंब्याची डहाळी

आंनदाची गुढी ।।

कडूलिंबाची साथ

त्याला फुलांचा गजरा

उत्साहाचा सण होई

आनंदात साजरा ।।

बांबूची काठी अन्

वर साखरेची गाठी

नव वर्षाचा पाडवा

भाव हृदयात दाटी ।।

मराठ मोळा सण

याला नववर्षाचा हर्ष

गुढी पाडव्याला असते

आमचे नविन वर्ष ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational