Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vishakha Kulkarni

Inspirational

2.5  

Vishakha Kulkarni

Inspirational

मायबोली

मायबोली

1 min
14.4K


ओळखतंय का कुणी मला? विचारतीय मायबोली

दीन झालीय वाणी तिची मान होती खाली ||

थोडं ऐका सांगते काही कंठ आला दाटून

हरवलंय ते वैभव कोणी देता का रे शोधून ||

शब्द,अक्षरे,गमभन साधी बोली ही विसरले

दूध `वाघिणी'चे मात्र सारे घटाघटा प्यायले ||

दिवस सरले,वर्षे गेली पण `ती'ची जादू कायम टिकली

सहज मग जाईल कशी ओठी प्रत्येकाच्याच रूळली ||

चार मायेच्या माणसांमुळे अजून आहे टिकून

अस्तित्वाच्या लढाई साठी द्यायचे आता झोकून ||

खचले नाही, हरले कधी वाटते एकच खंत

माझ्याकरिता थोडं कधी व्हाल का हो व्यक्त ||

अंतर आपले वाढले तरी जागवा मराठी बाणा

हात हाती घेऊन फक्त मायबोली साठी लढ म्हणा ||


Rate this content
Log in

More marathi poem from Vishakha Kulkarni

Similar marathi poem from Inspirational