STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational

3  

Pandit Warade

Inspirational

हिंदवी स्वराज्य

हिंदवी स्वराज्य

1 min
28.9K


राज्य हिंदवी स्थापिले

माझ्या राजा शिवबाने

आज सामान्य जनता

जगतसे आनंदाने


धन्य धन्य ती जीजाऊ

जन्म दिला शिवबाला

मोठ्या कष्टाने नेटाने

घडविले त्या राजाला


राज्य होते यवनांचे

कपटाचे जुलमाचे 

आई जीजाऊने ध्येय

ठेवियले स्वराज्याचे


स्वराज्याची रे शपथ

घेई खेळत्या वयात

निघे स्वराज्य स्थापण्या

चार मावळे सोबत


दात वाघाचे मोजतो

धाक शत्रूला घालतो

कावा गनिमी योजून

कसा शत्रूला जिंकतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational