STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Inspirational

3  

Sanjay Dhangawhal

Inspirational

आयुष्याच्या अखेरीस

आयुष्याच्या अखेरीस

1 min
472

आयुष्यभर कष्ट केलीत

पण मनासारखे जगता आले नाही

राब राब राबत गेलो

पण माणस् कळली नाहीत 


ईच्छा साऱ्या दुर ठेवून

आयुष्यभर गरज सर्वांची पुर्ण करत राहीलो

स्वतःसाठी कमी मात्र

दुसऱ्यांसाठी जास्त

 जगलो


नोकरी असेपर्यंत

सारकाही सुखासीन असतं

त्यानंतर मग सारकाही 

उदासीन दिसतं


निवृत्ती म्हणजे आरामाचे

दिवस असतात

त्या आरामालाही सारेच कसे

कंटाळलेले दिसतातं


आयुष्यभर किती मरमर केली

याचा कोणी विचार करतं नाही

पैशाशिवाय कोणी जवळचा वाटतं नाही


काय कुठे जमापुंजी असेल ती सांगून द्या

असा रोज उपदेश देतात

कागदपेन हाती घेवून 

नावे करण्याचा आग्रह धरून बसतात 


आयुष्याच्या अखेरीस

आपलेपणा पेक्षा

दुरावा जास्त असतो

काळजी घेण्याऐवजी

मनात स्वार्थ जास्त दिसतो


शेवटी काय.....

प्रॉपर्टीवर डोळा ठेवून

खोट प्रेम करतात

प्रॉपर्टीसाठीच तर सारे

नात्यागोत्यांच विभाजन करतात


जे कमावतो ते सार

वारसदारांच्या हक्कातच असते 

स्वतःसाठी मात्र पेन्शनशिवाय 

काहीच नसते


माणूस मेल्यानंतर स्मशानात 

पोहचवण्यापुरताच

त्याला आधार असतो

त्यानंतर तो कोणाच्याही

आठवणी नसतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational