STORYMIRROR

BHARAT CHOUGALE

Inspirational Others

3  

BHARAT CHOUGALE

Inspirational Others

बाप

बाप

1 min
426

बाप राबतो शेतात

घाम गाळतो मातीत

त्याच्या कष्टातून फुले

मळा पिकांचा डोलात //१//


बाप शेतात जाता

माती पायाला लागती

जगण्याची नवी उमेद

तया देऊन जाती //२//


बाप माझा कष्टकरी

कष्ट करून जगला

बळीराजा स्वतः म्हणवून

जगी मानाने मिरवला //३//


माय होती त्याच्या सोबती

जशी अंधारा आधार पणती

एकमेकांच्या आधारे

संसार गाडा पुढे नेती //४//


माझ्या बापाचे हे कष्ट

मज नित्य प्रेरणा देती

जीवनाची रे कसोटी

मज सांगून जाती //५//


बसता एकांत वेळी

मज आठवतो बाप

त्याच्या कष्टाचे जीने

मज शिकवते खूप //६//


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational