STORYMIRROR

BHARAT CHOUGALE

Abstract Inspirational

3  

BHARAT CHOUGALE

Abstract Inspirational

सुंदरता जीवनाची

सुंदरता जीवनाची

1 min
191

फुलणे सुंदर आहे

 कोमजणे सुंदर आहे

 फुलण्या कोमजण्यातला

दरवळ सुंदर आहे //1//

हसणे सुंदर आहे

 रडणे सुंदर आहे

 हसण्या रडण्याचे

कारण सुंदर आहे //2//

शौर्य सुंदर आहे

धैर्य सुंदर आहे

शौर्याधैर्यातले

मनोबल सुंदर आहे //3//

कर्म सुंदर आहे

धर्म सुंदर आहे

कर्मा धर्मातले

आचरण सुंदर आहे //4//

भक्ती सुंदर आहे

भाव सुंदर आहे

भक्ती भावा मधला

नाद सुंदर आहे //5//

जगणे सुंदर आहे

 मरणे सुंदर आहे

जगण्या मरण्यातले

अंतर सुंदर आहे //6//


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract