STORYMIRROR

BHARAT CHOUGALE

Abstract Tragedy Inspirational

3  

BHARAT CHOUGALE

Abstract Tragedy Inspirational

जीवनाच्या सुंदर वाटेवर

जीवनाच्या सुंदर वाटेवर

1 min
203

जीवनाच्या सुंदर वाटेवर 

सद्वर्तनाचा सडा घालूया

एकमेकांच्या सहकार्यातून

जीवन बाग फुलवूया //१//


मानव आपण

मानवासारखा व्यवहार करूया

जीवन पथावरील प्रत्येक वळणावर

मानवतेचा झेंडा रोवूया //२//


मनामनाच्या सुंदर गुंफणीमध्ये

सुविचारांची रोपण करूया

मनमंदिराची कवाडे

 मोठया धैर्याने उघडूया //३//


यशाची शिखरे

 हिमतीने पादाक्रांत करूया

 परस्परातील मतभेद 

बाजूला सारूया //४//


जातीभेदाच्या भिंती 

जमीनदोस्त करूया 

मानव जातीच्या कल्याणाकरिता

 अहोरात्र झिजूया //५//


 मानवता धर्माचे

 पालन करूया 

विश्व बंधुत्वाची भावना 

प्रत्येक हृदयात जागवूया //६//



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract