झुंज जगण्याशी
झुंज जगण्याशी
इथं जुंपलय मरण
दररोजच गळ्याशी
नात्याच्या जंजाळात
अडकलोय मुळाशी //१//
जगण्यासाठी नित्यनेमान
करावी लागते मरमर
कसा जगू मोकळेपणाने
जीव येतो वरवर //2//
रोजी रोटीच्या प्रश्नांन
अक्षरशः सोडलंय भंडावून
जीव आलाय मेटाकुटीला
गेलाय पार वैतागुन //3//
जीवनात होईना
मनासारखे काम कुठले
खर्ची घातले
उरलेसुरलेले श्वास सगळे //४//
जीवन एक कला
जमली त्याला जमली
कित्येक तरी हतबल
पुरती होऊन गेली //५//
जीवनात आता काही
राम नाही राहिला
जीवन म्हणजे काय
नेमका अर्थ नाही समजला//६//
खेळतोय झुंज दररोज
जगण्यातुन जगण्याशी
बघतोय मरण दररोज
जीव आणून कंठाशी //७//