साहित्यिक पुस्तक
साहित्यिक पुस्तक
साहित्यिक पुस्तकाचे मनोगत,
जाणे मोल त्या लेखणी तलवारीची.
नशा तिची अमृत्तुल्य असे दातृत्वाची,
तिची सोबत डोळस ज्ञान प्राप्तीची.
असे साहित्यिकांचे पुस्तके मनकवडे,
शोधे समाजाचे अंर्तमनीचा कवडसा.
आत्मसात करे विविध शैलीचा वारसा,
स्वप्नझेप भरारी घेई बिलोरी आरसा.
अमृतकुंभी झरा चढे सार्थकी जीवन,
निमिषार्धात घडे गुंजन काव्यत्वाची.
ज्ञानात भर पाडणाऱ्या कलागुणांची,
शिष्यास ध्येयप्राप्ती मार्गदर्शक गुरुची.
काही वाचक अस्तित्वाचे खरे वाटसरु,
प्रत्येक शब्दांचा स्पर्शगंध ते शोधत.
रंगी,सुगंधी पुस्तकांची वहिवाट वाचत,
सप्तगुणी दडलेली शैली करे प्रगत.
घडले नसानसात मराठी साहित्यकार.
विरळ झाले आता ते वाचक बुडणारे.
हौसेने देणाऱ्याचे हात हातात घेणारे,
अलौकिक मृदगंध देत सदा बहरणारे.
स्टोरी मिरर अॅप देणं साहित्यिकांस,
कौतुक,प्रमाणपत्राचे हे विश्वांगणी दालन.
बहरले मनामनातून साहित्यिक वारे,
त्या खंबीर नेतृत्वाला सदा मनस्वी वंदन.
