STORYMIRROR

Pandurang Padalkar

Inspirational

3  

Pandurang Padalkar

Inspirational

वचन तुजला भारतमाते...

वचन तुजला भारतमाते...

1 min
348

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनी

पुलकित झाली अवघी अवनी

राष्ट्रभक्ती न होणार कमी

भारतमाते ही तुजला हमी


बंधूभाव हा नित्य वसेल

खोट्या राष्ट्रवादाला थारा नसेल

प्रगत भारताचा ध्यास असेल

प्रयत्नांची इथे शर्थ दिसेल


देशभक्तांच्या शौर्याची कहाणी

गर्जत राहील रानोवनी

मानवतेची अमृतवाणी

गुंजत राहील कानोकानी


गुलाम पुन्हा कधी न होणार

स्वातंत्र्य आमुचे चिरायु राहणार

प्राणप्रिय तिरंगा डौलाने फडकणार

विश्वगुरू हा भारत बनणार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational