सर्वश्रेष्ठ दान
सर्वश्रेष्ठ दान
सर्व दानामध्ये श्रेष्ठ
करुनिया रक्तदान
जपू माणुसकी धर्म
कुणा मिळे जीवदान...१
स्वस्थ निरोगी शरीर
कार्य करते जोमाने
रक्तदान करताच
पुन्हा निर्मिती नव्याने....२
झीज भरते शरीर
काळ तीन महिन्यांचा
जीव वाचवून मिळे
अर्थ नवा जगण्याचा...३
जून महिन्यात येई
श्रेष्ठ दिन रक्तदान
करू चौदा तारखेस
कार्य जीवनी महान....४
होता संकलित रक्त
उपयोगी ने रुग्णास
जीव वाचविण्या देती
संकटाच्या समयास...५
लोका पटवू महत्व
श्रेष्ठ त्या रक्तदानाचे
वाचतील प्राण जगी
कार्य लोककल्याणाचे...६
