सृजनाचे वैभव
सृजनाचे वैभव
नवसृजनाचे वैभव तिच्या कुशीत वसते
मातृत्वाचे जगी दैवत ती म्हणजे आई असते
वात्सल्याची मूर्ती ती कृष्णाची माय यशोदा
संभाजी राजांसाठीची तिच धाराई असते
त्याग अन् शौर्याची मूर्ती शक्ती रुपिनी राजमाता
स्वराज्य निर्मात्या शिवबाची तिच जिजाऊ असते
शेण गोळे झेलणारी क्रांतिज्योती सावित्री ती
ज्ञानाचे कवाडे उघडणारी, मुलींची ज्ञानाई असते
रेशमाच्या नाजूक धाग्यांनी नाते घट्ट बांधते
चुकल्यास जवळ घेणारी प्रेमळ अशी ताई असते
संसाराचा गाडा हाकते राबराबते क्षणोक्षणी
संकाटात खंबीर उभी शंकराची गौराई असते
खळखळत्या हास्याचे वैभव घरची लेक सानुली
बोल बोबडे बोलणारी गोड लाडाई असते
आजी, आई, पत्नी, लेक नाते तेच सौख्याचे
मांगल्याची ती सरीता विश्वास जपणारी बाई असते
