माझी मनी
माझी मनी
चमकती डोळे तिचे
मनी माझी इटुकली
डोळे मिटून दूध पिते
पहा कशी धिटुकली..१
मऊ मऊ अंग तिचे
जशी शाल मखमली
कशी दिसते सुंदर
आहे जरी चिमुकली ..२
माझ्या जवळी असता
येते लाडात सानुली
लक्ष वेधण्यास माझे
देते आवाज मनुली...३
थोडे जोरात बोलता
पहा जरा घाबरली
येता आवाज मोत्याचा
केस तिने विस्फारली...४
मला पाहण्यास रोज
फेऱ्या मारते दारात
देता आवाज मी तिला
उड्या मारते जोरात...५
