चिऊताई
चिऊताई
1 min
398
इवल्याशा चिऊचे,
इवले इवले डोळे...
जवळ जाता तिच्या,
ती दूर दूर पळे....
इवल्याशा पायांनी,
ती अंगणात येई.
इवल्याशा चोचीने,
दाणे सारे टिपून घेई.
झाडावर बसून ती,
टकमक पाही.
चिवचिव तिचा,
घुमे दिशांत दाही.
काडी काडी जोडून,
बांधी घरटं छोटं,
पिल्लांसह तिथे,
सुख नांदे मोठं.
इवल्याशा चोचीतून,
पिल्लास भरवी दाणा.
बाळाला घास भरवाया,
चिमणा चिमणी आणा.
