नशीब
नशीब
आधी नशीब रुसलं,
मग सगळ्या वाईटच गोष्टी घडू लागल्या ....
असं दुःखाच्या डोहात वगैरे बुडल्यासारखं झालं माझं....
मग त्यातून सावरायचं म्हणून एक छान मित्र भेटला...
" अक्षर "..!!
त्या एका अक्षराला कितीतरी अक्षरे जोडल्या गेली....
मग त्यावर झाला " शब्द "..!!
मग " वाक्य ",
कधी " चारोळी ",
कधी " कविता ",
कधी " लेख " तर कधी " कथा "..!
आज अक्षरांनी ही साथ सोडली आहे....
अर्थात,
अक्षर रुसलं म्हणजे,
त्यापासून सुरू झालेल्या,
शब्द ते कथेचा प्रवास... सगळं संपलं.....
आता आयुष्य कधी रुसणार आहे,
आणि कसं रुसणार आहे...
काही ठाऊक नाही...
पण आयुष्य रुसलं की मी कायमची संपली....
माझ्या निरर्थक आयुष्यासह....
स्वतःच्या कामगिरीचा एक ही ठसा मागे न ठेवता....
