STORYMIRROR

suvidha undirwade

Others

4  

suvidha undirwade

Others

आठवांचा मृद्गंध

आठवांचा मृद्गंध

1 min
470

देऊन 

गेलास तू

तुझ्या डोळ्यात

दाटलेले गर्द 

काळोख ढग

माझ्या

शुष्क, कोरड्या

मिटल्या

पापण्यांना.....

आता,

बरसू लागला

श्रावण 

या शब्दसरींतून 

अन्

आठवांचा मृद्गंध 

दरवळू लागला

या स्मृतिगंधित

शब्दांत..... अविरत...


Rate this content
Log in