शब्दांची गझल
शब्दांची गझल
शब्दांमधूनी कळावे तुला,
शब्दांनीच मी छळावे तुला.
शब्दांच्या या जादू नगरीत,
शब्दातूनच मी शोधावे तुला.
शब्दांचाच आहे आसमंत सारा,
शब्दतारकांत या मोजावे तुला.
शब्दऋतूंच्या मोहक सोहळ्यात,
शब्दफुलांनीच सजवावे तुला.
शब्दांच्या तव स्वप्नकळ्यांना,
शब्द पापण्यात साठवावे तुला.
शब्दांच्या या मुक्त जगात मी,
शब्दांच्याच आरशात पहावे तुला.
शब्दांनीच जुळल्या गाठी,
शब्द नात्यातच गुंफावे तुला.
