STORYMIRROR

suvidha undirwade

Children Stories

4  

suvidha undirwade

Children Stories

फुगा

फुगा

1 min
627

आई मला एक तरी फुगा दे ना गं.

हिरवा निळा पिवळा कोणताही दे ना ग.


फुग्याचा दोर मी कंबरेला बांधीन.

फुग्यासोबत हळूहळू वरवर जाईन.

फुलपाखरांशी मैत्री करीन.

येताना त्यांचे रंग घेऊन येईन.

एक तरी छोटासा फुगा दे ना ग.

हिरवा निळा पिवळा कोणताही दे ना ग.

आई मला एका तरी फुगा दे ना ग. !! १ !!


फुग्यासोबत मी उंच उंच उडेन.

उंच उंच उडून आकाशाला भेटेन.

आकाशातून थोडे ढग घेऊन येईन.

ढगाची मी मऊ मऊ गादी एक बनविन.

असा उंच उंच उडणारा फुगा दे ना ग.

हिरवा निळा पिवळा कोणताही दे ना ग.

आई मला एकतरी फुगा दे ना ग. !! २ !!


फुग्यासोबत मी पक्षी होऊन फिरेन.

वाऱ्यावरती मनमुराद विहार करेन.

येताना वाऱ्याचा पंखा आणेन.

रोज तुला त्याचा गार वारा घालेन.

वाऱ्यावर उडणारा फुगा दे ना ग.

हिरवा निळा पिवळा कोणताही दे ना ग.

आई मला एक तरी फुगा दे ना ग. !! ३ !!


आई मला असा एक फुगा दे ना ग.

छोटासा एका तरी फुगा दे ना ग.

छोटासा एक तरी फुगा दे ना ग.

छोटासा एक तरी फुगा दे ना ग.


Rate this content
Log in