सुखाचा वारा
सुखाचा वारा
सुखाच्या वाऱ्या.... तू वाहतो कशाला?
अंत दुःखाचा.... तू पाहतो कशाला?
येणारच आहे.... वादळ यातनांचे,
ऋतुचक्रात या.... तू राहतो कशाला?
विसरती तव ते.... दुःखाच्या क्षणात,
असा स्मृतीभ्रंश.... तू साहतो कशाला?
गळतात अश्रू..... आनंदातही तयांचे
आसवांत त्या.... तू न्हातो कशाला?
दुःखाच्या अवसेला.... सुखाचं चांदणं
सुवीच्या गझलेत.... तू चाहतो कशाला?
