कविता
कविता
1 min
128
कविता
तुझ्या माझ्या
आपुल्या निखळ नात्याच्या
घट्ट निर्मळ निरागस मैत्रीच्या
कविता
भिडल्या नजरेच्या
आपुल्या निस्सीम प्रेमाच्या
दोन देहातील एकाच जिवाच्या
कविता
दिलेल्या वचनांच्या
आपुल्या लग्न सोहळ्याच्या
एकत्र गुंफलेल्या दोन नावाच्या
कविता
साकारल्या स्वप्नांच्या
आपुल्या सुखी संसाराच्या
कर्तव्य ऋतू खुलवल्या समाधानाच्या
कविता
सोबतीच्या प्रवासाच्या
आपुल्या साठीच्या सहवासाच्या
वार्धक्यात खंबीर झाल्या आधाराच्या
कविता
एकत्रित निरोपाच्या
आपुल्या मरणोत्तर सोबतीच्या
जन्मोजन्मी बांधल्या गेलेल्या रेशीमगाठीच्या
