प्राजक्त फूल
प्राजक्त फूल
लाल शाईच्या बदामात,
तू लिहीलेलं नाव माझं....
तुझ्याच कुशीत विसावण्याचं,
राहीलं दूर गाव माझं....
तुझ्या हृदयाला तोडणारं,
सोडलेलं बाण माझं...
अश्रुपूराने भिजलेलं,
त्याच वहीचं पान माझं....
आठवणीत भिजतांना,
ओघळलेलं दव माझं....
तुला आर्त साद घालतांना,
निघालेलं मंजुळ रव माझं...
स्वप्नात सजवलेलं,
चार भिंतीचं हसरं घर माझं....
स्वप्नातच ओलांडलेल्या,
उंबरठ्याचं दार माझं....
तुझं आयुष्य उध्वस्त करायला,
घोंघावत आलेलं वादळ माझं...
तुझा निस्वार्थ त्याग करून,
माझ्यावरच मारलेलं कुदळ माझं....
तुझ्या पुनरागमनाने,
करशील ना हसरं आयुष्य माझं...
होशील ना परत एकदा,
ओंजळीतलं प्राजक्तफूल माझं...
