STORYMIRROR

Sunita Patil

Inspirational

4  

Sunita Patil

Inspirational

माझी माय मराठी

माझी माय मराठी

1 min
258

माझी माय मराठीची 

काय वर्णावी महती 

छंद अलंकारातुनी 

साज तिला हो चढती .. १


संत ज्ञानोबा तुकोबा 

भाषा सकल संतांची 

गाती शाहीर पोवाडे 

साक्षी शिव स्वराज्याची.. २


मायबोली सकलांची 

हिचे स्वरुप देखणे 

नित्य नवे रुप दावी 

किती लिहावी कवने.. ३


माझी माय शोभीवंत 

जणू अमृत पाझरे 

सर्व भाषात दिसते 

तिचे रुपडे साजरे... ४


दर कोसा कोसांवर 

बोली ढंग बदलते 

तिचे वेगळे वैभव 

रंग तिला चढवते... ५


माझ्या मराठी भाषेत 

असे खजिना शब्दांचा

 होई लेखन सरस 

जन्म नव्या साहित्याचा... ६


वाढे जन माणसात 

असा गोडवा भाषेचा

महाराष्ट्र संस्कृतीला

अभिमान मराठीचा...७


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational