नको अडवू ते पाणी
नको अडवू ते पाणी
तरळलेल्या त्या डोहातले
नको अडवू ते पाणी
बजावत सांगत होते
मी वारंवार मलाच
नको लाज धरू कोणाची
कर मोकळे स्वतःला
एकांतात तू असताना
नको मारू मन स्वत:चे स्वतः
निरव शांततेत
सोबत तुझीच तुला
मन खंबीर करून
दे बळ स्वतःलाच उंच भरारी घेण्यास
