सुंदर ते ध्यान
सुंदर ते ध्यान


सुंदर ते ध्यान
पावसात भिजता दिसे
स्मित हास्य तुझे
स्वतःलाच दिलेले...
स्वतः गुंतलेली तु
सुख दुःख विसरत
हसत खेळत
स्वतःलाच सावरते...
पावसात भिजताच
मान वर करत
डोळ्यातून ही धारा
बरसतात हळूवार...
असते तेव्हाच तु
क्षणभरासाठी तुझीच तु
भानावर येताच शोधते
सुंदर ते ध्यान...