टाटा बाय बाय म्हणायला नाही धजले मन
टाटा बाय बाय म्हणायला नाही धजले मन


टाटा बाय बाय
म्हणायला नाही धजले मन...
नुसतीच घालमेल
मनात असंख्य आदराच्या अनेक भावना...
आदरांजली वाहिली देशाने साधेपणानी
नाही कोणता बडेजाव...
टाटा म्हणतांना
'रतन' आठवेल हमखास...
दुसर्यांना 'लक्झरी' देतांना
स्वतः अवलंबली साधीच राहणी...
खरी आदरांजली वाहण्यासाठी
एकतरी त्यांचा
'माणूसकी जपण्याचा' गुण
जोपासेल रोजच्या जीवनात माझ्या
मगच खर्या अर्थाने म्हणेल मी
टाटा बाय बाय...
सर रतन नवल टाटा बाय बाय...