भक्तीचा बाजार
भक्तीचा बाजार
भक्तीचा बाजार
मांडला आहे
सर्व धूर्तांनी
राजकारणी समाजकारणी
जागतिक व्यावसायिकांनी...
साधू संतांच्या
परकीय शिष्यांचा
आकडा मोठा
तो म्हणे
मीच श्रेष्ठ...
उलाढाल पैश्यांची
कोटीच्या कोटी घरात
सरकारही म्हणतो
माझ्या देशाचा
महाकुंभ संधीचा...
टेक्नॉलॉजीचा वापरकरून
पाळत प्रत्येकावर
डेटा भारताचा
कोणाच्या हातात?
भव्यदिव्यच्या नावाखाली
भक्तीचा बाजार
भक्तीचा बाजार...
