STORYMIRROR

Jayashree Kelkar

Inspirational

3  

Jayashree Kelkar

Inspirational

स्त्रीशक्ती

स्त्रीशक्ती

1 min
324

स्वतःची छबी आरशात खुणावतीये,

स्त्रीशक्तीने फुलव भावविश्व

असे कानात कुजबुजतीये!!


कल्पनाची उत्तुंग भरारी, मनू भाकरचा डबल धमाका,

सायना, सिंधू घडविती इतिहास मिताली राजचा विजयी चौका!!


अर्थकारण साहित्यादी क्षेत्र दावी स्त्रीशक्तीचा उत्कर्ष,

त्याग, प्रेमळ परंपरा विसरुनी ठेवी नवतेचा आदर्श!!


गुलामीचे जोखड झुगारुनी सर्जनशीलतेला वाव दे,

परंपरेचा तोल राखूनी बदलत्या प्रतिमेला न्याय दे!!


घेऊन उंच भरारी, लढुनी जगण्यातील संघर्ष, विस्तारलेल्या क्षितिजासमवेत होऊ दे तुझा वैचारिक उत्कर्ष!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational