Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Jayashree Kelkar

Inspirational

4.8  

Jayashree Kelkar

Inspirational

आजची स्त्री कशी असावी

आजची स्त्री कशी असावी

2 mins
1.0K


तू एक आजची स्त्री ,कुणाची लेक,कुणाची सून तर कुणाची भगिनी...

कुणाची सखी, कुणाची आई तर कुणाची सहचारिणी !


आधीची बाळबोध अबला 'ती 'अन आताची कणखर सबला 'तू'...

मिळविण्या आत्मसन्मान ,झगड तू न ठेऊन कसलाच किंतु !


आजची तू ,हो कधी प्रेमिका,बरसू दे तूझी माया अन ममता...

आहेस जरी तू शूर पण कायमच असुदे तुझ्यात नम्रता !


आजची तू, करावास त्याग कुटुंबी, नेहमीच देऊन त्यांना प्रेरणा ...

कायमच देऊन आदर मोठ्यांना,असावीस तू सदैव अन्नपूर्णा !


आदरातिथ्यात तुझ्या असु दे आपुलकी अन वागण्यात सात्विकता ...

सदैव हो तू ,कुटुंबाकरीता स्फूर्ती अन मिळवावीस प्रेमभरी शांतता !


कधी घे तू, कठोर निर्णय होऊन खंबीर अन तडफदार ...

कधी विचारी होऊन दे, इतरांना स्फूर्ती अन आधार !


जेंव्हा होशील हळवी अन लपविशी आपुल्याच वेदना...

चैतन्यात डुंबूनि उधळ तू ,कधीतरी स्वतःच्याच भावना !


कधी होऊन रसिक, लिही तू दिलखुलास संवादांची ओळ...

कधी गुंफ तू, काव्य चारोळी बांधुनि शब्दफुलांची मोळं !


परंपरा अन संस्कृती चा आदर करुनि मिळव तू दाद अन वाहवा...

झालाच अन्याय तर लढा दे,हो रणरागिणी- न करुनि कुणाचीच पर्वा !


कधी हो तू शांत ज्योत, कधी प्रखर तेज अन ऊर्जा...

तडफदार साहस अन निडरतेने लढ तू ,बनुनी बहाद्दूर नीरजा !


झेप घेऊन जिंक तू नवनव्या प्रगतीची क्षितिजे अन हो स्वावलंबी...

निर्भयतेच्या पंखात आहे बळ तुझ्या, नको होऊ तू परावलंबी !


कधी हो हिरकणी तू ,आपुल्या बाळासाठी मातृत्वाच्या प्रेमाकरिता...

कधी हो तू धगधगती सौदामिनी, चिंगारी हो समानतेकरता !


उच्च शिक्षणात तरबेज हो ,नसेल तुजला कुठलेच अगम्य क्षेत्र....

असंख्य आव्हाने पेलण्या अष्टपैलू नेतृत्व असे तुझे दुधारी शस्त्र !


उत्तश्रूंखुल स्वैर धिंगाणा नको घालू तू स्त्री मुक्तीच्या नावाने...

कितीही बरोबरी केलीस तरी जगायचंय तुला काही मर्यादांने !


आदर कर तू दुसऱ्या स्त्रीचा,जप तिचीही सुरक्षितता...

मागून मिळत नसतो आत्मसन्मान,कमवावा लागतो स्वतःकरता !

 

आजची स्त्री तू ,नाही दुर्बल कर प्रतिकार अत्याचाराचा...

पाहुनी प्रचंड क्षमता तुझी,सन्मान होईल तुझ्या आत्मनिर्भरतेचा !

तुझ्या आत्मनिर्भरतेचा !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational