Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Jayashree Kelkar

Others

4.7  

Jayashree Kelkar

Others

दिव्यत्वाची प्रचिती

दिव्यत्वाची प्रचिती

2 mins
219


------------------------

ऐका हो ऐका...

अवचित आले विघ्न जगावर,

कुटुंबे होती उध्वस्त... 

मदतीला आला देवदूती अवतार ,

करण्या भस्मासुराचा अस्त !


टाळेबंदीमुळे मंदिरे झाली बंद,

कंटाळुनी विठुराया गेला आपुल्या महाली...

मदतीशिवाय थकलेली रुक्मिणी,

देवांना पाहून आश्चर्याने हरखली !


ऐका हो ऐका...


अठ्ठावीस युगे उभे विटेवरी,

भक्तगणच नाही भेटीला...

तुझ्यासोबत वेळ घालविण्या,

तडक निघूनी आलो मदतीला !


बरीच कामे पडलीयेत, 

कोणीच नाहीत मदतीला...

टाळेबंदीमुळे दासदासी नाही आल्या,

पगारी सुट्टी मी दिली त्यांजला!


गावगप्पाना वेळ नाही, 

मदत करा हो मजला...

मी तर वैकुंठीचा राजा,

कामे येत नाहीत मला !


ऐका हो ऐका ...


चोखोबांची गुरे राखीलीत,

जनीच्या जात्यावर दळण दळलेत...

नाथांच्या घरी पाणी भरलेत,

नामदेवांच्या घरी पंगतीत वाढलेत !


सोयराबाईची लुगडी धुतलीत,

सावतामाळ्याच्या शेतात भाजी पिकवली...

दामाजीपंतांची कर्जे फेडलीत ,

गोरोबांची मडकी भाजली !


भक्तासाठी अठ्ठावीस युगे उभे राहिला,

आवलीच्या पायातील काटा काढला...

आता आठवण बरी झाली तुम्हाला ,

पण बायकोचे एकही काम नको करायला!


ऐका हो ऐका ...


रोज काकड आरतीला जाता,

शेज आरती झाल्यावर घरी येता...

टाळेबंदीमुळे घरी आलात,

आणि म्हणे माझ्यासाठी वेळ देता !


पंधरा दिवसांचा लॉक डाऊन,

आज बऱ्याच दिवसांनी एकत्र जेवू...

दोन आठवडे कामाची विभागणी करून,

भाजी भाकरी आनंदाने खाऊ!


ऐका हो ऐका ...


मनसुबे रचत असतानाच,

गरुडाने दिली वर्दी...

वार्ता होती नारदमुनी आल्याची,

चेहेऱ्यावर झाली काळजीची गर्दी !


ऐका हो ऐका ...


खाकी युनिफॉर्म,स्टेथोस्कोप,

झाडू बॅगेत भरुनी निघाले रुक्मिणीकांत...

हाहाकार माजलाय ग रुक्मिणी,

ऐकवत नाही लोकांचा आकांत !


नाही गेलो आज पृथ्वीवर,

तर लोकांचा उडेल विश्वास...

पोलीस,डॉक्टर,सफाई कामगार,

यांजकडे बघुनी टाकती ते निःश्वास !


ऐका हो ऐका ...


सत्वर निघाले ही रूपे घेऊनि ,

रुक्मिणी संग सहाय्याला...

अठ्ठावीस युगे तिने हेच केले,

आताही धावली मदतीला !


बरोबर घेऊनी औषधे भरपूर,

परिचारिकेचा गणवेश चढविला...

जेवणाचा डब्बा बरोबर घेऊनि,

तीही धावली सहाय्याला !


सावळा पांडू हवालदार,

कमरेवरी हात ठेवूनि विटेवरुन उतरला ...

निराधारांना भाजी भाकरी देण्या,

पुन्हा रस्त्यावर उभा राहिला !


ऐका हो ऐका ...


देवानेच रूप घेतले देवदूतांचे,

सर्वच लागले सेवेला...

यमदूतांना परतवू लागले,

साष्टांग नमस्कार त्या दिव्यप्रचितीला !


Rate this content
Log in