Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Jayashree Kelkar

Children

4.5  

Jayashree Kelkar

Children

खारूताईचा वाटा

खारूताईचा वाटा

1 min
349


खिडकीसमोर आहे एक उंच झाड...

नावगाव माहीत नाही वाढलंय मात्र ताडमाड 


वसंत ऋतूत पाने होतात हिरवीगार...

पहाटेपासूनच असतो पाखरांचा स्वैरसंचार !


कोकिळेची कुहुकुहू,पोपटांची मस्ती...

साळुंकीच्या उड्या, लव्हबर्ड्सची प्रेमाची कुस्ती !


हळूच एक मोठी फांदी खिडकीतून आली...

खारुताई ने घरात यायची आयतीच संधी साधली !


करवंद, जांभळं ,भुईमुगाच्या शेंगा... 

खारुताईने मेवा पळवून दाखवला ठेंगा !


कॅमेरात बद्ध करताना गोल डोळे लुकलुकले...

भित्र्या भागूबाईचे कान क्षणात उभे राहिले !


झुपकेदार शेपटी हलवत पळाली सरसर झाडावर...

चपळता तिची पाहून हेवा वाटला क्षणभर !


भुईमुगाची शेंग कुडूम कुडूम खाल्लीस...

कांगारुची छोटी प्रतिकृती तू मजला भासलीस !


फळे,कोवळे कोंब खाताना जमिनीत बिया पुरल्यास ...

नकळत पर्यावरणाचा होणारा ह्रास थांबवलास !


वृक्ष संवर्धनाचे काम झाले सहज अजाणता...

कृती तुझी सांगते कर्म करा,फळाची अपेक्षा न करता !


एवढासा जीव तुझा पण धावलीस रामसेतू बांधायला...

श्रीरामांचा आशीर्वाद मिळाला कायमचा मिरवायला !


धन्य ती खारुताई!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children