सृष्टीचा पाहुणा
सृष्टीचा पाहुणा
1 min
489
नभ आलेत दाटूनी
गेला वाराही सांगून
बरसल्या जलधारा
सूर्य गेला झाकोळून..१
काम पावसाने केले
आली लहर सूर्याला
पसरले किरणास
वेध थेंबांचा घेण्याला..२
पश्चिमेच्या क्षितिजाला
आला पाहूणा नभाचा
गूज केले धरित्रीशी
मित्र झाला किरणांचा..३
रवी किरणांनी नभी
सप्त दिप उजळले
सात रंग घेऊनिया
इंद्रधनू प्रगटले...४
सप्त रंगांची कमान
हात जणू अवनीचे
आकाशाच्या मंडपात
होई मिलन प्रेमींचे..५
असा दुर्मिळ पाहुणा
अचानक हरवतो
हुरहूर जीवा लावी
खेळ नव्याने खेळतो...६
